नागपूर -शासकीय विभागात अभियंता असलेल्या एका इसमाच्या पत्नीने चक्क नागपूरात डॅाक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. एक कोटी रुपये न दिल्यास मुलाच्या अपहरणाची धमकी त्या महिलेने दिली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच नागपूर शहरातील बेलतरोडी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. शीतल इटनकर असे त्या महिलेचे नाव असून ती देखील फॅशन डिझायनर आहे. घर खर्च भागात नसल्याने तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे, महत्वाचे म्हणजे तिच्या नवऱ्याचा पगार दीड लाख रुपये आहे.
हेही वाचा-सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने फटकारले, "संकटकाळात तुम्ही एखादा देवदूत असल्यासारखा वावर होता"
कुरिअर मार्फत पाठवले धमकीचे पत्र -
शीतल इटनकर या महिलेला स्वतःच बुटीक सुरू करण्याची इच्छा होती, त्याकरिता तिने नवऱ्याकडे पैशाची मागणी सुद्धा केली, मात्र आधीच नवीन घर बांधल्यामुळे कर्जाचा डोंगर झाल्याने तिच्या नवऱ्याने पैसे देण्यास नकार दिला. या दरम्यान ती महिला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज बघत होती, तिच्या मनातील महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने परिचीत असलेले डॉक्टर तुषार पांडे यांना करिअर मार्फत धमकीचे एक पत्र पाठवले ज्यात तिने एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. एक कोटी रुपये न दिल्यास मुलाच्या अपहरणाची धमकी त्या महिलेने दिली होती.
हेही वाचा-आगळे-वेगळे गाव!!! आजही घरांना आणि बँकेलाही नाहीत दरवाजे