नागपूर - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असल्याने चिंतेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्या पुन्हा सर्जरी करण्यात येणार आहे, असे डॉक्टर म्हणाले.
हिंगणघाट प्रकरण : पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र चिंता कायम - wardha crime news
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असल्याने चिंतेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ती नागपुरच्या ऑरेज सिटी रुग्णालयात उपचार घेत आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डोळ्यांची सूज थोडी कमी झाल्याने लवकरच नेमकी परिस्थिती समोर येईल, असे डॉक्टर म्हणाले. मात्र, पीडितेच्या वेदना वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता असून संसर्ग होण्याची देखील दाट शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एक संपूर्ण आईसीयू युनिट केवळ या पीडितेसाठी राखीव करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.