महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरात रस्त्याच्या दुतर्फेला 120 कोटी वृक्ष करणार -गडकरी

देशातील लोकसंख्येनुसार 120 कोटी वृक्ष राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्याचे उद्दिष्ट्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवले आहे. ( National Highway Authority ) हे उदिष्ट जरी कठीण वाटत असले तरी पूर्ण करण्याचा विश्वासही बोलून दाखवला आहे. एनएचआयची वृक्षतोडणारे ही प्रतिमा समाजात निर्माण झाली ती दूर करण्याचे काम या वृक्षलागवड मोहीमेतून करणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

वृक्ष लागवड करताना नितीन गडकरी आणि मान्यवर
वृक्ष लागवड करताना नितीन गडकरी आणि मान्यवर

By

Published : Jul 17, 2022, 8:05 PM IST

नागपुर - राष्‍ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्‍यावतीने एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (लिटा) यासह विविध विभागाच्या सहकार्याने ‘हरित पर्यावरण चळवळ या महावृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. ( LIT Alumni Association ) यात एका दिवसात प्रत्येकी 1 हजार झाडे या प्रमाणे 100 ठिकाणी वृक्षारोपण करून चळवळीचे उद्घाटन नागपुरातील एलआयटी परिसरात केंद्रीय नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. ऑक्‍सीजन उत्‍सर्जिंत करणाऱ्या झाडांमुळे एलआयटीचा परिसर लवकरच ‘ऑक्‍सीजन पार्क’ होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला आहे.

कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी

द्वारका एक्‍स्‍प्रेस हायवेवर 12 हजार झाडांचे प्रत्‍यारोपण - देशभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ रस्त्यावर झाडे तोडण्याचे काम करतात. पण देशात रस्त्याचे जाळे विणणारे गडकरी यांनी झाडे तोडण्‍यापेक्षा प्रत्‍यारोपण करण्‍यावर भर देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. द्वारका एक्‍स्‍प्रेस हायवेवर 12 हजार झाडांचे प्रत्‍यारोपण करण्‍यात आले असल्याचेही म्हणाले आहेत. तसेच, देशातील युवा पुढी कॉलेज शाळा यांच्या माध्यमातून मैदानावर झाडे लावून त्या झाडाचे संगोपन करण्याची जवाबदारी द्या असेही सूचना मनपा आणि स्थानिक प्रशासनाला केल्या आहेत.

एक झाड तोडायचे असल्‍यास दहा झाडे लावावी - एका झाडाचे प्रत्‍यारोपण करायचे असल्‍यास पाच नवी झाडे लावावी लागतील. एक झाड तोडायचे असल्‍यास दहा झाडे लावावी लागतील. वृक्षारोपण करताना कार्बन डॉय ऑक्‍साईड शोषून घेणारी व अधिक ऑक्सिजन उत्‍सर्जिंत करणारी झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली जाणार असेही गडकरी म्हणाले आहेत.

मान्यवर उपस्थित होते - या कार्यक्रमाला राष्‍ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे सल्‍लागार अशोक कुमार जैन, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्‍त बी. राधाकृष्‍णन, लक्ष्‍मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एलआयटी)चे संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे अध्‍यक्ष माधव लाभे, प्रकल्‍प प्रमुख श्रीकांत गुडधे, सचिव उत्‍कर्ष खोपकर, ग्रीन फाउंडेशनचे दिलीप चिंचमलातपुरे, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

हेही वाचा -उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा भरणार उमेदवारी अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details