नागपूर - देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind Nagpur Visit) हे रविवारी नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) भव्यदिव 132 एकरात विस्तारलेल्या कॅम्पसच्या उद्घाटनासाठई आले होते. यावेळी त्यांनी देशातील युवकांना मार्गदर्शन केले. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये विद्यार्थ्यांमध्ये रोजगार देणारे होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अनुरुप अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. पण हा दौरा त्यांचा पहिला दौरा नव्हता.
रामनाथ कोविंद नागपूर भेट- राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद हे 22 सप्टेंबर 2017 ला नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीला सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकला, ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देत असल्याचे म्हणत येथे पवित्र भूमीत येवून अपार प्रसन्नता झाल्याचा अभिप्राय नोंदवला. त्यानंतर कामठी येथील विपस्त्याना केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले होते. आयआयएम नागपूरचा हा त्यांचा दुसरा दौरा होता.
के. आर. नारायण नागपूर भेट - याच दिक्षाभूमीचे उद्घाटन देशाचे 10 वे राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते झाले. 18 डिसेंबर 2001 रोजी ते नागपुरला आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी यावेळी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक केले होते, अशी माहिती डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक असलेले प्रकाश खरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.