नागपूर -उपराजधानी नागपुरात वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे परत एकदा नागपूरकरांवर संचारबंदीचे बंधन लादण्यात आली आहेत. या परिस्थितीसाठी प्रत्येक नागपूरकरांची बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा कारणीभुत आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. गेल्यावर्षी ११ मार्चला नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यावेळी नागरिकांना स्वतःच्या जीवाची चिंता होती. मात्र, कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतर चित्र बदलेल आहे. आता नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नागपुरात कोरोनाचा विळखा वाढला आहे. या संदर्भात काही नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे याची जाणीव नागपूरकरांना आहे. मात्र, नियम पाळण्याची इच्छा त्यांच्यात नसल्याचं देखील दिसून येत आहे.
हेही वाचा -'त्या' मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील; फेब्रुवारीतच विकली होती कार
संचारबंदी हा पर्याय नाही- सामान्य नागरिक
प्रशासनाच्या मनात येईल त्यावेळी संचार बंदीचा निर्णय घेतला जातो मात्र,त्यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांचे किती नुकसान होतं याचा अंदाज कोणीही घेत नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. नागपूर शहरात कोरोना वाढतो आहे हे सत्य असलं तरी त्यावर संचारबंदी हा पर्याय ठरू शकत नाही असं देखील मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्याऐवजी प्रसासनने जनसामान्यांचे हित लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे काही जण म्हणत आहेत.