नागपूर - नागपूर शहर जगाचा आणि देशाच्या पटलावर चांगलं शहर, उत्तम शहर म्हणून नाव लौकिक व्हावे, या दिशेने आम्ही पाऊल उचलत असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. ते शासकीय ध्वजारोहणानंतर माध्यमांशी बोलत होते. शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ऊर्जामंत्री यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.
कोरोनाचे वर्ष आयुष्यातून काढून टाकण्या सारखेच-
मागचे वर्ष हे आयुष्यातून काढून टाकण्यासारखे आहे. सर्वच विकास कामे आपापल्या ठिकाणी थांबलेली आहे. परंतू आता नागपूर शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रलंबित योजना आहेत. त्यांना पुन्हा चालना द्यायची आहे. याची सुरवात म्हणून आज गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नामकरण स्वतः मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.