महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दुष्काळाच्या झळा: नागपूरच्या सीमाभागातील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - development

नागपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून झपाट्याने प्रगती करत आहे.  मध्यंतरी शहरालागत असलेल्या ग्रामीण नागपूरचा काही भाग शहरात समाविष्ट झाल्याने महानगरपालिकेवर सर्वांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आली आहे.

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By

Published : May 10, 2019, 5:42 PM IST

नागपूर - नदी, तलाव आणि धरणांनी समृद्ध असा नागपूरला सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शहराच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कधीकाळी पाणीदार असलेल्या नागपुरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

नागपूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या भागात नवीन नागपूरचा विस्तार होत आहे. त्या भागात मात्र नागरिक सुविधांचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नवीन विस्तारित नागपूरमध्ये पाण्याच्या पाईप लाईन्सचे जाळे अद्याप निर्माण झाले नसल्यानेच या भागात टँकरने पाणी पुरवठा होत असून, पाच दिवसातून एकदा पाणी मिळत आहे.

नागपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून झपाट्याने प्रगती करत आहे. मध्यंतरी शहरालागत असलेल्या ग्रामीण नागपूरचा काही भाग शहरात समाविष्ट झाल्याने महानगरपालिकेवर सर्वांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आली आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना महानगर पालिकेने सर्वात आधी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्याची गरज होती, मात्र अद्यापही पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच निर्माण न झाल्याने परिसरातील नागरिकांना आधी पाण्याची सोय करून मग पोटाची सोय करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

नरसाळा, हुडकेश्वरसह परिसरातील भाग हे नागपूर महापालिकेमध्ये समाविष्ट झाले आहे. या परिसरात अद्याप पिण्याचे पाईपलाईन पोहचले नाही, काही भागात पाईपलाईन टाकल्या गेल्या मात्र त्याचे कनेक्शन दिले नाही, त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असे महापालिकेच्या पाणी समितीचे अध्यक्ष सांगत आहेत. शहरात सगळीकडे पाणी समस्या नसून काही भागातच पाण्याची समस्या असलेय्चा महापालिक सांगते. नवीन भागात ३८७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा पाच दिवसातून एकदा नियमित होत असला तरी एवढे पाणी पुरत नाही, त्यामुळे आमच्या भागात लवकर पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details