महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vijayadashami : रावणाने जगवल्या सहा पिढ्यांना, सातव्या पिढीला दिला आधार

रावण दहनाच्या परंपरेला ( Traditions of burning Ravana ) धार्मिक, ऐतिहासिक असे महत्त्व लाभले आहे. असत्यावर-सत्याचा विजय साजरा करण्यासाठी विजयादशमीच्या ( Vijayadashami ) संध्येला रावण दहन केलं जातं. रावण वध ( Killing Ravana ) म्हणजे अज्ञानतेवर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते.

Vijayadashami
विजयादशमी

By

Published : Oct 3, 2022, 10:32 PM IST

Updated : Oct 3, 2022, 11:00 PM IST

नागपूर -भारतीय संस्कृतीत रावण दहनाच्या परंपरेला ( Traditions of burning Ravana ) धार्मिक, ऐतिहासिक असे महत्त्व लाभले आहे. असत्यावर-सत्याचा विजय साजरा करण्यासाठी विजयादशमीच्या ( Vijayadashami ) संध्येला रावण दहन केलं जातं. रावण वध ( Killing Ravana ) म्हणजे अज्ञानतेवर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते.

रावणाने जगवल्या सहा पिढ्यांना

रावण तयार करण्याची ऐतिहासिक कला -दसऱ्याला रावणाकडे तिरस्काराच्या नजरेतून बघितले जाते, तोच रावण नागपुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा पोषणकर्ता ठरला आहे. नागपूर शहरातील महाल भागात राहणारे हेमराजसिंग बिनवार कुटुंबाच्या सहा पिढ्या रावणाने जागवल्या आहेत. रावण तयार करण्याची ऐतिहासिक पारंपरिक कला बिनवार कुटुंबाने सहा पिढ्यांपासून जोपासली आहे. सातवी पिढी सुद्धा वडिलोपार्जित कला जिवंत राहावी यासाठी झटत आहे. श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव, वध करून कैदेत आलेल्या सितेची सुटका केली होती. त्याचा विजयोत्सव म्हणजे रावण दहन. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा याकरिता देखील रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. मात्र,त्याचं रावणाने हेमराजसिंग बिनवार कुटुंबाला कलेचे वरदान दिले आहे.

विजयादशमी

रावणामुळेचं समाजात ओळख -लंकापती रावणाने आम्हाला समाजात ओळख दिली, रोजगार दिला. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे भरणपोषण देखील केले. एवढेच नाही तर आजवर आमच्या सहा पिढ्या सुद्धा रावणानेच जगवल्या. आमच्या करिता रावण म्हणजे पालनकर्ता आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रावणाचा देखील नाईलाज झाला होता. आता निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे केले जात असल्याने पुन्हा आमच्यासाठी रावण देवदूत ठरला असल्याचं बिनवार कुटुंबीय सांगतात. रावण तयार करण्याची कला-संस्कृती जपण्यासाठी आणि कला जिवंत ठेवण्यासाठीच बिनवार कुटुंब सदैव प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

विजयादशमी

मध्य भारतात मोठी मागणी :खेमकरणसिंग बिनवार यांनी तयार केलेल्या रावणाला केवळ नागपूरचं नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात मोठी मागणी आहे. एवढेच काय तर खेमकरणसिंग बिनवार यांनी तयार केलेले रावण मुंबईला सुद्धा पाठवले जायचे. मात्र गेल्या दोन वर्षात सारे काही बदलून गेले आहे. यावर्षी विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून ऑर्डर मिळाले आहेत. आमच्या सहा पिढ्या रावण तयार करण्याची कला जोपासली आहे. मात्र, पुढे ही कला जिवंत कशी ठेवायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला असल्याचे खेमकरणसिंग बिनवार म्हणाले आहेत. त्यामुळे शासनाने आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा बिनवार यांनी व्यक्त केली आहे.

रावणाचा वध
Last Updated : Oct 3, 2022, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details