नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण या उत्सवाच्या माध्यमातून संघ आपल्या संघटन कौशल्याचे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शन करत असतो. विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्या भाषणाला एकप्रकारे सिग्नेचर स्पीचची मान्यता आहे. त्यांच्या भाषणाचा प्रभाव देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात दिसून येतो. त्यामुळे संघाचा विजयादशमी उत्सव स्वयंसेवकांसाठी दिशादर्शक मानला जातो. संघाच्या विजयादशमी उत्सवात आणखी काय-काय होते? कोण उपस्थित असतात? यामागचा इतिहास काय आहे? या संदर्भात माहिती जाणून घेऊया....
हेही वाचा -Dussehra Special सर्व वाईट शक्तींचे करा दहन, मात्र जाणून घ्या रावणातील हे '7' गुण
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना:-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ साली केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संघ हा ९६ वर्षांचा झाला आहे. आरएसएस ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. देशातील सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा उल्लेख होतो. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन देखील केले जाते, हिंदू मान्यतेनुसार शस्त्र पूजनाला फार महत्त्व आहे.
- विजयादशमी उत्सव परंपरा-