नागपूर - पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागला नाही. तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यथित होऊन त्याच खापर काँग्रेसवर फोडत आरोप करत आहे, असे वक्तव्य राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा स्वतःचे पाप लपवण्यासाठी हे आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली.
Vijay Wadettiwar on PM Modi Statement : 'पराभव दिसत असल्याने व्यथित होऊन पंतप्रधान बोलले' - Vijay Wadettiwar
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यथित होऊन त्याच खापर काँग्रेसवर फोडत आरोप करत आहे, असे वक्तव्य राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा स्वतःचे पाप लपवण्यासाठी हे आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली.
![Vijay Wadettiwar on PM Modi Statement : 'पराभव दिसत असल्याने व्यथित होऊन पंतप्रधान बोलले' मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14404094-1065-14404094-1644305705030.jpg)
ओबीसीबी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. पण ती केस आज न्यायालयाच्या बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे सुनावनीची तारीख दुपारनंतर स्पष्ट होईल. परंतु वकिलांची एक टीम लक्ष ठेवून आहे. सुप्रीम कोर्टाच्या अपेक्षेप्रमाणे ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचा सरकारने पूर्ण प्रयत्न केला आहे. त्यामुळे ओबीसींना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे, असे ओबीसी नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
कोरोना वाढवण्याचे काम भाजपाने केले आहे. पायघड्या घालून ट्रम्पला गुजरातमध्ये नेण्यात आले. महाराष्ट्रात कोरोना नव्हता तो बाहेरून आला. कुंभमेळाव्यात लाखो लोकांची गर्दी केली. भाजपाने गर्दी करण्याचे काम केले. आता मात्र स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर टीका करत आहे. कोरोनामुळे राज्य सरकारकडे मदतीसाठी 2 लाख 42 हजार लोकांचे अर्ज आले. पण 80 टक्के म्हणजेच 1 लाख 77 हजार लोकांना महाराष्ट्र सरकारने मदत केली आहे. गुजरात सरकारने आकडे लपवण्याचे पाप केले. गुजरातमध्ये 13 हजार लोकांचा मृत्यू झाला. पण मृत्यनंतर मदतीसाठी 1 लाख 24 हजार लोकांनी अर्ज केले म्हणजे त्यानी आकडे लपवले. पण महाराष्ट्र सरकारने 2 लाख 40 हजार मृत्यू दाखवले आहे. यात अर्ज 2 लाख 43 हजार आले.