नागपूर: पुन्हा कोरोना निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार ( State Disaster Management Minister Vijay Vadettiwar ) यांनी दिली. ते आज नागपुरात बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, येत्या दिवसात शाळा आणि महाविद्यालये उघडणार आहेत. तसेच पावसाळ्याचे दिवस आहेत. संसर्ग वाढूच नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी हा काँग्रेससचा ( Elections should be uncontested ) प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेस नेते राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांची भेट घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सध्या सामान्य जनतेचे मुद्दे सोडून इतर मुद्द्यांवर जास्त चर्चा होत असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.