नागपूर -पवारांच्या चारित्रहननाचे प्रायश्चित ईडीनी घ्यावे आणि महाराष्ट्रच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले आधी पावरांची प्रतिमा मलिन केली. आता प्रकरण 'बुमरॅंग' झाले म्हणून ईडीने प्रकरण मागे घेतले, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मी जेल रिटर्न नाही आणि तडीपार सुद्धा नाही असे पवार सोलापूरच्या सभेत म्हणाले. त्यांनी हे कुणाला म्हटले हे जनतेला माहिती आहे. त्यांनी तसे म्हटले नसते तर असे झाले नसते असे राज्यातील लोक म्हणतात.
ईडीच्या प्रकरणावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आक्रमक, म्हणाले... - शरद पवार बातमी
पवारांचे चारित्रहननाचे प्रायश्चित ईडीनी घ्यावे आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते
हेही वाचा -कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी नाकाबंदी; टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
आता आरोप करणे देखील गुन्हा ठरतोय. लोकशाही कुठे राहिली, असा सवाल देखील त्यांनी केला. ८० वर्षांच्या पवारांनी आयुष्य स्वच्छ आणि निष्पक्षपणे घालावले त्यांच्या वयाचा विचार केला नाही. सर्वच चोर नसतात असे देखील ते म्हणाले.