नागपूर -विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वात महत्वाचे मानले जाणारे हिवाळी अधिवेशन ( Winter Session 2021 ) सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा नागपूर ऐवजी मुंबईला घेतले जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet Meeting ) घेण्यात आला आहे. एका प्रकारे ही घोषणा म्हणजे नागपूर कराराचा भंग ( Violation of Nagpur Agreement ) असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटली आहे. गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागपूर येथे प्रस्तावित हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात आले होते. यावर्षी कोरोना नियंत्रणात असताना देखील विदर्भाच्या हक्काचे अधिवेशन मुंबईला पळवण्यात आले, असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते धर्मापाल मेश्राम यांनी केला आहे. तर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.
- काय आहे नागपूर करार?
29 डिसेंबर 1953 रोजी नागपूर करार अस्तित्वात आला. यामध्ये मुंबईसह, मध्यप्रदेश आणि हैदराबाद राज्याच्या मराठी भाषा भागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. 29 डिसेंबर 1953 रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने प्रथम राज्य पुनर्गठन आयोग नेमले होते. या आयोगाचे सदस्य हृदयनाथ कुंजरू, के.एम पनिकर, माधव श्रीहरी अणे आणि ब्रिजलाल बियाणी या नेत्यांनी राज्य पुनर्गठन आयोगाला स्वतंत्र विदर्भासाठी एक निवेदन पत्रिका सादर केली. राज्य पुनर्गठन आयोगाने या निवेदन प्रक्रियेवर आणि इतर संबंधित बाबींवर विचार केल्यानंतर नागपूर राजधानी असलेले वेगळे विदर्भ राज्याचा अनुग्रह केला. परंतु राज्य घटना आयोगाच्या राज्य पुनर्गठन आयोगाच्या शिफारशीनंतर ही 1956 मध्ये विदर्भ द्विभाषिक मुंबई राज्याचे भाग झाले. त्यामुळे नागपूर शहराने राजधानीची मान गमावला.
- आश्वासने हवेत विरली
अखंड महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करताना अनेक आश्वासने देण्यात आली होती. ज्यामध्ये विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. विदर्भातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये २३ टक्के प्राधान्य दिले जाईल. सिंचन वाढवले जाईल, मात्र या मागण्या कधीही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत असल्याचे मत विदर्भवादी नेते अरुण केदार यांनी व्यक्त केले आहे.
- नागपूर आणि विदर्भाला काय मिळाले?