महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Budget 2022 : विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनकडून अर्थसंकल्पाचे स्वागत, क्रिप्टो करन्सी ठरणार 'गेम चेंजर' - विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन अर्थसंकल्प स्वागत

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला (Budget 2022) आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून (Vidarbha Industries Association) बजेटचे स्वागत करण्यात आले.

Vidarbha Industries Association
विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन

By

Published : Feb 1, 2022, 3:14 PM IST

Updated : Feb 1, 2022, 4:12 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला (Budget 2022) आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून (Vidarbha Industries Association) बजेटचे स्वागत करण्यात आले. आजचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने स्पष्ट केलं आहे की, त्यांना बिझनेस करण्यात रस उरलेला नाही. खासगीकरणाच्या माध्यमातून सरकार महसूल गोळा करेल. सरकार आता 68 टक्के भारतीय वस्तूंवर खर्च करणार आहे, त्यामुळे आजच्या बजेटकडून ज्या अपेक्षा होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण होत असल्याचे मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी व्यक्त केले.

सुरेश राठी - अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन

विदर्भातील उद्योगाच्या वाढीच्या दृष्टीने दोन महत्वाचे क्षेत्र फार महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये कृषी आणि रक्षा क्षेत्रात विदर्भात खूप वाव आहे. डाळ, कापूस, फूड प्रोसेसिंग, डेरी कॉ- ऑपरेटिंग सोसायटी तयार होण्यास वाव आहे. तसेच विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज हबच्या माध्यमातून रक्षा क्षेत्रातील विकास करता येईल.

क्रिप्टो करन्सी देशासाठी आवश्यक :-

डिजिटल क्रिप्टो करन्सीला आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिला मान्यता देत रिजर्वे बँक ऑफ इंडिया करेन्सी जारी करणार आहे. ज्यामुळे सरकारला खूप फायदा होईल, असं त्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 1, 2022, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details