महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Flex Engine Bikes : सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिनवर धावणारी वाहने - नितीन गडकरी

तीन कंपन्याकडून फ्लेक्स इंजिनवर धावणारी वाहने येत्या सहा महिन्यांत येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी दिली. या वाहनांचे इंजिन शेतीच्या उत्पादनापासून तयार होणाऱ्या इथेनॉल या इंधनाने चालेल. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे इथेनॉल पंप असतील, असेही त्यांनी म्हटलं.

Nitin gadkari
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी

By

Published : Dec 26, 2021, 7:29 PM IST

नागपूर : सहा महिन्यांच्या कालावधीत तीन कंपन्याकडून फ्लेक्स इंजिनवर धावणारे वाहन ( flex Engine Bike ) बाजारात येईल. या वाहनांचे इंजिन शेतीच्या उत्पादनापासून तयार होणाऱ्या इथेनॉल या इंधनाने चालेल. याबाबतच्या मार्गदर्शक सुचना निघाल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी ( Minister Road Transport And Highways Nitin Gadkari ) नागपूरात बोलताना दिली. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर ( Minister Agriculture Narendra Singh Tomar ) हे उपस्थित होते.

ऍग्रो व्हीजनच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी समृध्द झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेती केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ऍग्रोव्हिजनची ही संकल्पना पुढे आली. भविष्यात शेतकरी हा केवळ अन्नदाता नाहीतर उर्जानिर्माता झाला पाहिजे. तसेच, इथेनॉल हे भविष्यातील वाहनाचे इंधन होईल असे स्वप्न तेरा वर्षापुर्वी पाहिले होते, ते स्वप्न साकार होणार असून 100 टक्के फ्लेक्स इंजिन असणारे वाहन सहा महिन्यांत उपलब्ध होईस, असेही त्यांनी सांगितले.

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ( Former Prime Minister Lal Bahadur Shastri ) यांनी दिलेला जय जवान जय किसानचा नारा आज प्रत्यक्षात उतरताना दिसून येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा सहाय्याने हे सगळे बदल शक्य झाले आहे. स्पेशल टेक्नॉलॉजी मशीन इथेनॉल मध्ये कॅलरी कमी असल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होते. पण नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीत बदल झाल्याने एक लीटर जेवढे पेट्रोल वाहन मायलेज देते तेवढेच मायलेज आता 62 रुपयांत मिळणाऱ्या इथेनॉल मुळे मिळणार आहे. सुजूकी, हुंडाई आणि टोयोटाच्या या तीन कंपन्याच्या या दुचाकी असतील. हे वाहन इथेनॉलवर धावणार असल्याने शेतकऱ्यांचे इथेनॉल पंप असतील, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details