नागपूर -लसीअभावी आज नागपुरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १८ वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठी सहा हजार डोस आले होते. दोन दिवसात यातील हजार डोस संपले. आता केवळ पाच हजार डोस शिल्लक आहेत. शिल्लक डोस १८ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांना देणार आहेत.
लसीअभावी आज नागपुरातील बहुतांश केंद्रांवर लसीकरण बंद - nagpur vaccination updates
लसीअभावी आज नागपुरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १८ वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठी सहा हजार डोस आले होते.
दरम्यान, साठा संपल्याने रविवारी शहरातील १८९ केंद्रांपैकी १५९ केंद्रांवरील लसीकरण ठप्प होते. त्यामुळे सोमवारी शहरातील लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. शहरात १८९ लसीकरण केंद्र सुरू असून, त्यात महापालिकेचे १०२ आणि शासकीय आणि खासगी ८७ केंद्र आहेत. रविवारी फक्त २ हजार ४०४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल येथे १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. या वयोगटासाठी सहा हजार डोस आले आहेत. दोन दिवसात एक हजार डोस देण्यात आले आहेत.