नागपूर पौराणिक,ऐतिहासिक,धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असलेला बडग्या मारबत उत्सव Marbat Festival 2022 आज नागपूरकरांच्या अभूतपूर्व उत्साहात Nagpur Special Festaval संपन्न झाला. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी निर्बंधाची साखळी सैल झाल्यानंतर, आज सार्वजनिकरित्या काळी आणि पिवळी मारबतची the black and yellow marbat भव्य मिरवणूक निघाली. तेंव्हा नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत Unprecedented colors of historical Badgya Marabat होता. सकाळी दहा वाजताच्या सुमारास काळी आणि पिवळ्या मारबतच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, सीए मार्गावर दोन्ही मारबतीचे मिलन झाले. त्यानंतर त्या आपल्या मार्गानी मार्गस्थ झाल्या. यावेळी अनेक बडग्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
नागपुरात ऐतिहासिक बडग्या मारबत उत्सवाची अभूतपूर्व रंगत
नागपूर शहराचा व्यापारी परिसर असलेल्या इतवारीच्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळ्या मारबतीच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. तर काळ्या मारबतची मिरवणूक नेहरू पुतळ्याजवळील पोहा ओळीतुन सुरू झाली. काळी आणि पिवळी मारबतीचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर, खऱ्या अर्थाने मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला होता. त्यानंतर सीए मार्गावरील गांधी पुतळ्यासमोर पुन्हा एकदा दोन्ही मारबतींचे मिलन झाले. मारबत उत्सव बघण्यासाठी लाखो नागपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी Millions of citizens flocked to see केली होती.
बडग्यांनी वेधले साऱ्यांचे लक्षआजच्या मारबत उत्सवात एका बडग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एक बडग्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशुन होता. भोंगे झाले बंद, फोकनाड झाले जेल मध्ये बंद अश्या शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेण्यात आला. तर लवासा ओके आणि बारामती ओके म्हणत भाष्य करण्यात आले. याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. काय ती स्मार्ट सिटी, काय ते रस्ते, काय ते खड्डे आणि काय ते प्रशासन सर्व ओके म्हणत, आपला रोष नागपूरकरांनी व्यक्त केला.
मारबत उत्सव म्हणजे काय जाणून घ्याजगभरात प्रसिद्ध झालेला मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. इंग्रजांची राजवट देशात असतांना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरू केला होता,त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला. खरं तर गणेशोत्सवापेक्षा ही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.
१४२ वर्षांची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरानागपूर सह विदर्भाची १४२ वर्षांची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा संपन्न असलेला बडग्यामार्फत उत्सव सुरू झालेला आहे. समाजातील अनिष्ट रूढी प्रथांचे उच्चाटन करण्याचे हेतूने पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याला या मार्बतीची मिरवणूक काढली जाते. यामध्ये ऐतिहासिक काळी आणि पिवळी मारबतींसह बडगे देखील तयार केले जातात. मारबत उत्सव साजरा करण्यामागे एक उद्धिष्ट आहे. वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा दहन करून, चांगल्या परंपरा आणि विचारांचा स्वागत करणे म्हणजे मारबत उत्सव आहे. मारबत उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भ देखील दिला जातो.
पिवळी मारबतीची परंपरानागपूरच्या जगनाथ बुधवारी या भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सवाला १८८५ साली सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला १३८ वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचे दहन केले जाते. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत अश्या प्रकारच्या घोषणा देत ओरडत फिरतात.
काळी मारबतीची परंपरात्याकाळी भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात काळी मारबत काढली जाते,त्याच बरोबर काळी मारबती ला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला १४२ वर्ष पूर्ण झाले आहेत.
हेही वाचाNagpur Marbat Festival History 2022 ईडा पिडा, रोग राई घेऊन जाणाऱ्या मारबतीचा काय आहे इतिहास, जाणुन घेऊया