महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हात,पाय बांधून तरुणाचा खून; नागपुरातील धक्कादायक घटना - सिद्धार्थ नगर नागपूर

शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, मृतदेहाचे हात आणि पाय बांधलेले होते.

शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय बांधलेले होते.

By

Published : Aug 9, 2019, 6:12 PM IST

नागपूर- शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय बांधलेले होते.

खून झालेल्या २० वर्षीय तरुणाचे नाव साहिल प्रमोद तांबे असे आहे. अज्ञात आरोपींनी संबंधित व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय बांधलेले होते.

आज (दि.९ ऑगस्ट) रोजी सकाळी अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर भागातील रिकाम्या भूखंडावर साहिलचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यावर अजनी पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केल्यावर मृतदेहाची ओळख पटली. यावेळी मृतदेहाच्या तोंडात काडी कोंबलेली असल्याचे दिसून आले.

साहिलची हत्या कोणी व कोणत्या कारणास्तव झाली आहे, हे तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही. त्याच्यावर चोरीसहीत अन्य काही गुन्हे दाखल आहेत.

अजनी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details