महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'शेतकऱ्यांची मागणी अयोग्यच; कृषी कायदे रद्द होणार नाहीत, मात्र त्यात सुधारणा अपेक्षित' - रामदास आठवलेंची शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचबरोबर कृषी कायदे रद्द करा, ही मागणी अयोग्य आहे. कृषी कायदे रद्द होणार नाहीत, मात्र त्यात बदल होईल, अशी प्रतिक्रियाही रामदास आठवले यांनी दिली आहे.

Union Minister Ramdas Athavale
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

By

Published : Dec 13, 2020, 3:43 PM IST

Updated : Dec 13, 2020, 3:51 PM IST

नागपूर -गेल्या १७-१८ दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात यावे. शिवाय कृषी कायदे रद्द करा, ही मागणी अयोग्यच आहे. कृषी कायदे रद्द होणार नाहीत, मात्र त्यात बदल होईल. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच शेतकऱ्यांनी दोन पावलं मागे येऊन चर्चा करुन यावर तोडगा काढावा, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले प्रतिक्रिया देताना
शेतकऱ्यांनी चर्चा करावी, कायदे रद्द होणार नाहीत-
कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. मोदी सरकारकडून या तीनही कायद्यात सकारात्मक बाजू मांडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगाच थंडीत आंदोलन करू नये. असेही रामदास आठवले यांनी म्हटले. या शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तयार आहेत, मात्र शेतकरी चर्चा करायला तयार नाही. सरळ-सरळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. हे चुकीचे आहे. असेही आठवले म्हणाले.
आंदोलनात फक्त हरियाणा व पंजाबमधील शेतकरी -
शिवाय हे आंदोलन फक्त हरियाणा आणि पंजाब मधले शेतकरीच करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या आंदोलनात फक्त काही ठराविक संघटनांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यातील शेतकरी यात नसल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले. अशावेळी शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करून यातून तोडगा काढला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेत विजय आमचाच -
आगामी मुंबई महानगरपालिकेत आम्ही भाजप सोबतच लढणार आहोत. त्यामुळे भाजपचा महापौर तर आठवले गटाचा उपमहापौर होईल, असा दावाही आठवले यांनी यावेळी केला.
Last Updated : Dec 13, 2020, 3:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details