नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:ला विलगीकरण केले असून आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासोबतच आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण - नितीन गडकरी ताज्या बातम्या
मंगळवारी अस्वस्थ आणि थकवा जाणवत असल्याने गडकरींनी डॉक्टरांच्या सल्ला घेतला. यावेळी कोरोना चाचणी करण्याच्या त्याच्या डॉक्टरांनी त्यांना सुचवले. यानंतर कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.
नितीन गडकरी
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. यानंतर नेहमीची आरोग्य तपासणी केली असता मला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चे विलगीकरण केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा'.