नागपूर -नागपुरात झालेल्या एका साहित्य संमेलनाची आठवण करत साहित्य संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये, असे एक वक्तव्य केले होते. मात्र ती भूमिका योग्य नसल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवारी) बोलून दाखवली. ते विदर्भ सहित्य संघाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आभासी पद्धतीने उपस्थित होते.
साहित्यातून प्रेरणा घेऊन आपले काम करणारे अनेक राजकारणी आणि समाजकारणी आपल्याला पाहायला मिळतात. पण असे असताना एक-दुसर्याचा संबंध नाही म्हणणे ही गोष्ट मात्र योग्य नाही. राजकारण असो की समाजकारण प्रत्येक क्षेत्राचा संबंध कुठे ना कुठे साहित्यक्षेत्रात सोबत जोडलेला दिसून येतो. मात्र प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत आपली लक्ष्मणरेषा ओळखून काम केले पाहिजे. साहित्य ही एक चळवळ आहे, मात्र ही चळवळ त्या प्रमाणात वाढली नाही. यात लोकांना दोष देण्यापेक्षा सर्वाना सोबत घेऊन लोकांना कसे जोडता येईल, यासाठी काम केले पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.
सेवाभावी समाज वृत्ती निर्माण करायची असल्यास चांगला समाज निर्माण करण्याची दृष्टी साहित्याकांची असते. आणीबाणीच्या काळात लोकशाही टिकावी म्हणून साहित्यिकांनी संघर्ष केल्याने आज लोकशाही जिवंत आहे, असेही ते म्हणाले. विदर्भ साहित्य संघाचा 99 वा वर्धापन दिन असून 100 व्या वर्षात म्हणजे शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. यंदा विदर्भ साहित्य संघाचे महत्वाचा वर्षे आहे. विदर्भाच्या साहित्याला दिशा देण्याचे काम विदर्भ साहित्य संघाने केलेले आहे, अशी भावनाही नितीन गडकरींनी बोलतून दाखवली.
Vidarbha Sahitya Sangh : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला साहित्यिकांना सल्ला, म्हणाले...
साहित्यातून प्रेरणा घेऊन आपले काम करणारे अनेक राजकारणी आणि समाजकारणी आपल्याला पाहायला मिळतात. पण असे असताना एक-दुसर्याचा संबंध नाही म्हणणे ही गोष्ट मात्र योग्य नाही. राजकारण असो की समाजकारण प्रत्येक क्षेत्राचा संबंध कुठे ना कुठे साहित्यक्षेत्रात सोबत जोडलेला दिसून येतो. मात्र प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत आपली लक्ष्मणरेषा ओळखून काम केले पाहिजे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी