नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून निर्गुणवतणुकी करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर आर्थिक विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. "ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारीं" या म्हणींप्रमाणे विचार केल्यास सरकारचे काम धंदा करने नसून म्हणत निर्गुणतवनुनिकीला चालना देऊन सरकारी कंपन्याच्या विकास साधने हे असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते नागपूरात मॉइल म्हणजे मॅग्नीज कंपनीच्या कर्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे गडकरी हे वित्त मंत्री यांच्यासोबत डिसइन्व्हेस्टमेंट कमिटीतही आहे.
यावेळी मंचावर केंद्रीय राज्य पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद हेही उपस्थितत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत चिखला माईनमध्ये 2 व्हर्टिकल शाफ्टचे आणि रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.
मॉईलच्या व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल -
मॉइल मागील काळापासून सातत्याने प्रगती करत आहे. मॉइल हे एक कुटुंब म्हणून जो उल्लेख केला आहे. त्यामुळे सुख दुःखात सोबत राहून काम करणार हा परिवार असा त्याचा अर्थ आहे. यातच परिवार म्हटले की परिश्रम घेत चांगले नाव आणि प्रगती ही सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे तयार झाली असल्याचे कौतुक केले. कोरोना काळात कंपनीचा नफा घटला असताना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नाने केंद्रीय राज्य पोलाद मंत्री यांनी 28 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर केले आहे. जर मी या शहराचा सर्वात चांगला माणूस आहे तर ध्यानात ठेवा शहरातील सर्व चुकीचे काम करणारे माणसे ही माझ्या विरोधात नाही. त्यामुळे मॉइलचे वरिष्ठ अधिकारी आहे घाबरू नका, निर्णय घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. अशा शब्दात केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी मेग्निज ओर इंडिया लिमिटेड म्हणजेच मॉईलच्या व्यवस्थापनाला खडे बोलही सुनावले.