नागपूर - 'कहो ना प्यार है! असं म्हणण्याचं आमचं वय नाही, आम्ही आता भंगारमध्ये.. म्हणजेच आमचं वय झालंय..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. नागपुरात होत असणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या चषकाचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. क्रीडा संघटनांमध्ये आमच्यासारख्या राजकीय लोकांप्रमाणे भांडणे नसायला हवीत, असेही ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.
VIDEO : 'कहो ना प्यार है! म्हणायचं आमचं वय नाही.. आम्ही आता भंगारमध्ये'; पहा गडकरींचे भाषण.. - नागपूर क्रीडा महोत्सव नितीन गडकरी भाषण
नागपुरात होत असणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या चषकाचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना, क्रीडा संघटनांमध्ये आमच्यासारख्या राजकीय लोकांप्रमाणे भांडणे नसायला हवीत, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
नागपूरमध्ये 12 ते 24 जानेवारी दरम्यान या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 31 प्रकारचे खेळ होणार असून, तब्बल 38 हजार खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच एकूण 78 लाखांची बक्षीसे यामध्ये दिली जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यावेळी बोलताना, नागपूर हे खेळाच्या बाबतीत महाराष्ट्रात नंबर एकचे शहर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या क्रीडा महोत्सवात कुस्तीपटू बबीता फोगट आणि अभिनेता सनी देओल येणार आहेत, त्याशिवाय आम्हीही असूच, असेही गडकरी म्हणाले.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट