नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज नागपूर-हैदराबाद महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी असा सहा पदरी रस्ता आणि मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. एवढेच नाही, तर बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला.
'या उड्डाण पुलाचे काम उत्तम आणि कमी कालावधीत पूर्ण' -
नागपूरला वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद या शहरांना जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम तत्काळ गरजेचे होते. मात्र, यासंदर्भातील वाद न्यायालयात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा उड्डाणपुल रखडला होता. ज्यामुळे अपघाताची संख्या वाढली होती. मात्र, न्यायालयातून हे प्रकरण निकाली निघताच या ठिकाणी भव्य उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. तसेच इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्तम आणि कमी कालावधीत झाल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.