महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आमदाराच्या पोटातून आमदार.. अन् खासदाराच्या पोटातून खासदार' हीच काँग्रेसची संस्कृती' - महाविकास आघाडी

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपल्याला मंत्र्यांच्या यादीचा एक संदेश आला. त्यातील मंत्र्यांची नावे पाहिल्यानंतर हे सरकार शाहु-फुले- आंबेडकर यांच्या नावाने खोटे राजकारण करत असल्याची टीका नितीन गडकरींनी केली.

Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Jan 3, 2020, 7:41 PM IST

नागपूर -काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आपणास भेटतात आणि आपली खंत बोलून दाखवतात. यात प्रामुख्याने पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान तर खासदाराच्या पोटातून खासदार, असेच होत असल्याचे सांगतात. काँग्रेसची हीच घराणेशाहीची पद्धत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील मांढळ आणि तारण या ठिकाणच्या निवडणूक सभांमध्ये नितीन गडकरी बोलत होते.

नागपूर येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

हेही वाचा... प्रणिती शिंदेंना मंत्रीपद देण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा अडसर, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक

नितीन गडकरी यांनी यावेळी राज्य सरकारवर देखील जोरदार टीका केली. महाविकास आघाडीमध्ये देखील मंत्रीपद वाटताना कोणाची बायको, कोणाचा मुलगा तर कोणाचा भाऊ असे सगळे कुटुंबातीलच मंत्री बनलेत. मात्र, एखाद्या व्यासपीठावर आल्यावर हे सगळे 'आंबेडकर-शाहू-फुले' यांच्या नावाने भाषण देतात. ही सगळी एक नंबरची नाटक कंपनी आहे, असा टोला गडकरी यांनी लगावला.

हेही वाचा... 'सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते?'

पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान, आमदाराच्या पोटातून आमदार, खासदराच्या पोटातून खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षाकडून पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष, अशीच परंपरा काँग्रेसची असल्याची टीकाही गडकरींनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details