महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नियमित योगा, प्राणायाम करा, आजारांना दूर पळवा - नितीन गडकरी - Union Minister Nitin Gadkari celebrates Yoga Day

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन नागपुरातील जुने उच्च न्यायालय परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्यांनी योगासने करून उपस्थितांचा उत्साह वाढवला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Jun 21, 2021, 12:18 PM IST

नागपूर -केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्यातर्फे आज नागपुरात ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला आणि योगासने करून उपस्थितांचा उत्साह वाढवला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी साजरा केला योग दिन

'योग करा आजार टाळा'

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील जुने उच्च न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिवाय नागरिकांनी न चुकता रोज योग केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले आहे. नागपुरातील जुने उच्च न्यायालय परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व कळले असून, कोरोना काळात रुग्णांना योगाचा मोठा फायदा झाला आहे. मला सुद्धा योगाचा फायदा झाला. मी प्राणायाम करतो, त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर रोज करोडो लोक बघतात. प्रत्येकाने योगा करायला हवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा -International Yoga Day 2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंदसह दिग्गज नेत्याचा 'योगा'त्सव....

ABOUT THE AUTHOR

...view details