नागपूर - येणाऱ्या गणेशोत्सवात मूर्तिकारांनीही मातीच्याच मूर्ती बनवा आणि आपणही मातीच्याच मूर्तींचा खरेदी करा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ( Plaster of Paris Ganesh idol ) मूर्तिकारांच्या दबावात येऊ नका, असा संकल्प घेण्याचे आवाहन मूर्तिकार आणि नागरिकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी केले आहे. ते नागपुरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्य पर्यावरण पूरक गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'मातीच्या मूर्तिकाराना बाजार उपलब्ध करून द्या' :आजच्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर त्या कामाची कलेची गुणवत्ता ही महत्त्वाची असते. महत्वाचे म्हणजे मूर्ती बनवताना लागणारा कच्चा माल हा निशुक्ल मिळल्यास फायदा होईल. त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या धर्तीवर मूर्तिकार प्रोड्युसर कंपनी तयार करून त्यांना कच्चा माल कमी किंमतीत किंवा निशुल्क देता येईल का? यासाठी खादी ग्रामउद्योगाचे माध्यमातून मदतीसाठी खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांना योजना बनवावी, अशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरीनी यावेळी दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पर्यावरणपुरक मूर्तींना चांगला बाजार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी प्रदर्शनी भरून जाहिरात करून त्यांना बजार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केंद्रीय मंत्री गडकरी दिल्या आहेत.