नागपूर - देशभरात तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. 1 मार्चपासून देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक नागपूरातील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना व्हॅक्सिन लावून घेतली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सपत्नीक घेतली कोरोनाची लस
देशभरात तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. 1 मार्चपासून देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे.
एम्सचे वैद्यकीय अधिकारी उपस्थितीत-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णलयात सकाळी जाऊन कोरोनाच्या लसीची पहिला डोस घेतला आहे. यावेळी एम्सचे वैद्यकीय अधिकारी उपस्थितीत होते. लस सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद-
सुरवातीला वैद्यकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर यांना कोरोना लसीकरण करण्यात आले होते. आता तीसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात झाली असून जेष्ठ नागरिक तसेच 45 वयोगटातील नागरीकांना इतर बीपी शुगर सारखे आजार असल्यास त्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने नागरिक पुढे येऊन लसीकरण करून घेत आहे. यात अनेक अफवा कुशंका असल्या तरी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. मनपाच्या वतीने पाचपावली, इंदिरा गांधी हॉस्पिटल तसेच आयसोलेशन रुग्णलायात सकाळी आणि सायंकाळी 10 पर्यंत, अश्या दोन टप्प्यात लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणी पोहचली एटीएसची टीम