महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फुटबॉल मैदानात वीज पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी - football field

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील फुटबॉल मैदानात काही तरुण फुटबॉल खेळत असताना वीज पडल्याने, दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर, एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये २२ वर्षीय तन्मय सुनील दहिकर आणि २५ वर्षीय अनुज कुशवाह या दोन तरुणांचा समावेश आहे.

फुटबॉल मैदान
फुटबॉल मैदान

By

Published : Sep 11, 2021, 1:59 AM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील फुटबॉल मैदानात काही तरुण फुटबॉल खेळत असताना वीज पडल्याने, दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर, एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये २२ वर्षीय तन्मय सुनील दहिकर आणि २५ वर्षीय अनुज कुशवाह या दोन तरुणांचा समावेश आहे. ज्यावेळी वीज मैदानात पडली तेव्हा सुमारे ४० मुले येथे खेळत होते. सुदैवाने इतरांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

खेळाडूंना याच अंदाज येण्यापूर्वीच वीज मैदानात पडली

आज सकाळपासूनच नागपूर जिल्हात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाच्या वातावरणात फुटबॉल खेळण्यासाठी अनेक तरुण खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील चनकापुर येथील हनुमान नगरच्या ग्राउंड एकत्रित झाले होते. त्याचवेळी पावसाने जोर धरला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. खेळाडूंना याच अंदाज येण्यापूर्वीच वीज मैदानात पडली. ज्यामध्ये तन्मय सुनील दहिकर आणि अनुज कुशवाह या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर मामाकडे आलेला सक्षम गोतीफोडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

जखमी वर रुग्णालयात उपचार सुरू

वीज पडल्यानंतर तीन तरुण खाली कोसळले. त्यांना लगेच नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो)मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषीत केले. तर, एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल कण्यात आले आहे. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details