महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रंगपंचमी साजरी केल्यानंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या 2 तरुणांचा बुडाल्याने मृत्यू - देवानंद पवार मृत्यू नागपूर

उत्साहात होळीची धुळवड साजरी केल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील शिवा (सावंगा) येथे घडली. मंगेश इंगळे आणि देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत.

Rangpanchami nagpur two youths died
रंगपंचमी दोन तरुण बुडाले नागपूर

By

Published : Mar 19, 2022, 9:11 AM IST

नागपूर - उत्साहात होळीची धुळवड साजरी केल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील शिवा (सावंगा) येथे घडली. मंगेश इंगळे आणि देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा -धक्कादायक : सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणुक; डॉक्टरने नवजात मुलीला विकले 7 लाखांत

संपूर्ण नागपूर जिल्ह्यात होळीची धुळवड अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरी झाली. कुठेही अप्रिय घटनेची नोंद झाली नव्हती. मात्र, दुपारी नदीवर अंघोळीसाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची बातमी संध्याकाळी समोर आली. मंगेश इंगळे आणि देवानंद पवार हे दोघेही होळीची धुळवड साजरी केल्यानंतर आंघोळीसाठी नदीवर गेले होते. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

मृतदेह शोधण्यात यश -

दोन तरुण नदीत बुडाल्याची माहिती समोर येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी प्रशासनाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा -Nagpur Pushpa Fever Holi : नागपुरात धमाल इकोफ्रेडली, पुष्पा फिवर धुळवड रंगली; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details