महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Star Buses Fire Nagpur : दोन महिन्यात तीन स्टार बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी; आकस्मिक पाहणी होणार - स्टार बसेसना लागलेल्या आगीच्या घटना

दोन महिन्यात तीन स्टार बसेस आगीच्या ( Star buses fire Nagpur ) भक्ष्यस्थानी गेल्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहे. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत. या अनुषंगाने नागपूर महानगर पालिका आणि आरटीओ ( Nagpur Municipal Corporation and RTO ) अधिकाऱ्यांची एक बैठकी झाली आहे. यामध्ये बसेस पेटण्याच्या घटनांवर चर्चा झाली. दोन्ही विभागांचे संयुक्त पथक गठित करून डेपोंची आकस्मिक पाहणी ( Contingency inspection ) करण्याचे निश्चित झाले आहे.

Star Buses Fire
Star Buses Fire

By

Published : May 9, 2022, 4:01 PM IST

नागपूर -शहराची जीवन-वाहिनी म्हणून ओळख असलेल्या स्टार बसेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना परिवहन सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्टार बसवर आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात तीन स्टार बसेस आगीच्या ( Star buses fire Nagpur ) भक्ष्यस्थानी गेल्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहे. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत. या अनुषंगाने नागपूर महानगर पालिका आणि आरटीओ ( Nagpur Municipal Corporation and RTO ) अधिकाऱ्यांची एक बैठकी झाली आहे. यामध्ये बसेस पेटण्याच्या घटनांवर चर्चा झाली. दोन्ही विभागांचे संयुक्त पथक गठित करून डेपोंची आकस्मिक पाहणी ( Contingency inspection ) करण्याचे निश्चित झाले आहे.

नागपूर शहराची परिवहन व्यवस्था असलेल्या स्टार बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. योग्य मेंटेनन्स अभावी बसेस भंगार होत आहेत. भेसळयुक्त डिझेलमुळे आग लागत असल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. स्टार बसला आग लागली की प्रत्येकवेळी शॉर्टसर्किटचे कारण पुढे करण्यात येत. मात्र त्यामागील नेमकी कारणे शोधण्याची तसदी नागपूर महानगर पालिकेचे परिवहन विभाग घेत नसल्याने गेल्या दोन महिन्यांत तीन स्टार बसेस पेटल्या आहेत. तीन बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यानंतर आता मनपाचे आणि आरटीओचे अधिकारी कारणे शोधणार आहेत. त्यातून खरंच काही निघेल का हा खरा प्रश्न आहे.



दोन महिन्यांत तीन बसेस जळाल्या :नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची जबाबदारी असलेल्या स्टार बस एकामागे एक जळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 8 मार्च रोजी काटोल मार्गावर धावत्या स्टार बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर 31 मार्च रोजी मेडिकल चौकात सुद्धा प्रवाशांनी भरलेल्या स्टार बसने पेट घेतला होता. काही दिवसांपूर्वी 5 मे रोजी सुद्धा एक स्टार बस संविधान चौकात जळाली होती. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भाचे तापमान 45 ते 46 डिग्री पर्यत गेलेले आहेत. तापमानात मोठी वाढ झाल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये केवळ बसेसचे नाही तर दुचाकी आणि ट्रकचा देखील समावेश आहे.

हेही वाचा -MCD Action in Shaheen bagh :दिल्लीच्या शाहीन बागमधील अतिक्रमण कारवाई ठरली फुसका बार!

ABOUT THE AUTHOR

...view details