महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Police Suspended : लेट नाईट पार्टी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी निलंबित - हिंगणा पोलीस स्टेशन

रविवारी रात्री खरसमारी गावाजवळ झालेल्या लेट नाईट पार्टी ( Late night party case) प्रकरणात पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कचुराई केल्याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस परदेशी यांची आधीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील एका नेत्याच्या मुलाने तरुणांसाठी ही पार्टी आयोजित केली होती
चंद्रपुरातील एका नेत्याच्या मुलाने तरुणांसाठी ही पार्टी आयोजित केली होती

By

Published : Jul 6, 2022, 10:08 PM IST

नागपूर -हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खरसमारी गावाजवळच्या चंद्रपूर येथील एका नेत्याच्या मुलाने तरूणाईसाठी पार्टी ( Late night party case) आयोजित केली होती. ज्यामध्ये दारू विथ लाऊड डीजे अँड डान्स करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण तरुणी सहभागी झाले होते. धक्कादायक म्हणजे या पार्टीच्या आयोजना संदर्भात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. रविवारी रात्री डीसीपी गजानन राजमाने हे राऊंडवर असताना त्यांना या पार्टीची माहिती समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीसीपी गजानन राजमाने यांनी धाड टाकली, तेव्हा तिथे हजारो लिटर अवैध दारू साठा मिळून आला होता. आयोजकांनी पार्टीच्या आयोजना संदर्भात पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली होती. मात्र, परवानगी देताना लावण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्टी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी निलंबित

हेही वाचा -Mumbai Monsoon Updates : मुंबईत पाऊस पुन्हा सुरू, हवामान खात्याकडून 'अलर्ट'; सतर्कतेचा इशारा

पार्टी प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई -पोलीस ठाण्यात हद्दीत इतकी मोठी पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना नसने हे पटत नसल्याने पोलीस आयुक्तांनी बिटवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित ( Two police officers suspended ) केले आहे. पुढील काही दिवसात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाऊड डीजे अँड डान्स करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण तरुणी सहभागी

पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली -हिंगणा पोलीस स्टेशन ( Hingana Police Station ) हद्दीत सुरु असलेल्या या पार्टीची स्थानिक पोलिसांना कशी काय माहिती नव्हती या कारणास्तव हिंगणा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पार्टीतमध्ये ड्रग्सचा वापर झाला का यावर बोलतांना नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.

चंद्रपुरातील एका नेत्याच्या मुलाने तरुणांसाठी ही पार्टी आयोजित केली होती

हेही वाचा -Uddhav Thackeray : 'तुम्हाला देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाही'; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details