महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अवघ्या आठ दिवसांत म्हाडा कॉलनीत प्रेम प्रकरणातून दोन हत्या

या हत्या प्रकरणाला प्रेमप्रकरणाची किनार आहे. कपिल नगर पोलिसांनी अमनदीपसिंगच्या हत्येप्रकरणी त्याचा मित्र सम्यक बागडेला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

अमनदीप सिंग कुलदीप सिंग
अमनदीप सिंग कुलदीप सिंग

By

Published : Aug 25, 2021, 3:29 PM IST

Updated : Aug 25, 2021, 5:05 PM IST

नागपूर - कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत पुन्हा एकाची हत्या झाली आहे. अमनदीपसिंग राजेंदरसिंग राजपूत (२३) असे मृत तरुणाचे नावे आहे. या हत्या प्रकरणाला प्रेमप्रकरणाची किनार आहे. कपिल नगर पोलिसांनी अमनदीपसिंगच्या हत्येप्रकरणी त्याचा मित्र सम्यक बागडेला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्याच आठवड्यात याच कॉलनीत कमलेश बंडू सहारे नामक तरुणाची हत्या झाली होती. कमलेशची हत्यादेखील प्रेम प्रकरणातून झाली होती.

काही तासांतच आरोपीला अटक

मृत पाजी उर्फ अमनदीपसिंग कुलदीपसिंग हा काल रात्री कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीच्या गल्ली नंबर १७मध्ये सम्यक नावाच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये एका तरुणीच्या विषयावरून वाद झाला. बघता-बघता हा वाद इतका विकोपाला गेला की सम्यक बागडेने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने पाजीवर वार केले. ज्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच कपिल नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षण अमोल देशमुख आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत सम्यक बागडे घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन घटनेच्या काही तासातंच त्याला अटक केली आहे.

सम्यकच्या मौत्रिणीसोबत पाजी वाढवत होता मैत्री

कपिल नगर पोलिसांनी आरोपी सम्यक बागडेला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली, की मृत पाजी हा त्याच्या प्रेयसीसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याची हत्या झाली.

आठवडाभरातील दुसरा खून

आठवडाभराच्या अंतरात कपिल नगरच्या म्हाडा कॉलनी परिसरात प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या झाली आहे. १८ ऑगस्टच्या रात्री कमलेश बंडू सहारे नामक तरुणाची एका अल्पवयीन तरुणीच्या दोन भावांनी मित्राच्या मदतीने खून केला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसात पाजीच्या हत्येने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Aug 25, 2021, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details