नागपूर -दोन खुनाच्या घटनांनी नागपूर शहर हादरले आहे. अवघ्या 12 तासात नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घरी पाणी भरत नाही या कारणावरून क्रूर बापाने दहा वर्षीय मुलाची ( The father killed the ten year old boy in koradi ) हत्या केली आहे. तर दुसरी घटना जरीपटका पोलीस ( Jaripatka police ) ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग भागात ( Bezenbag Murder Case ) घडली आहे. आईवरून शिवी दिल्याच्या कारणावरून एका बांधकाम मिस्त्रीने सहकारी कामगाराच्या डोक्यात लाकडी दांडू मारून हत्या केली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
पहिली घटना : दोन दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी झोपडपट्टी भागात घडली आहे. क्रूर दारुड्या बापाने स्वतःच्याच मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. गुलशन उर्फ गबरू मडावी, असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे तर संतलाल मडावी असे निर्दयी बापाचे नाव आहे. आरोपी संतलाल मडावी हे चाकू सूरी आणि कैचीला धार लावण्याचा व्यवसाय करतात. आरोपी संतलालला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी चार वर्षांपूर्वीचे् विभक्त झाली होती. दारू पिऊन संतलाल हा दोन्ही मुलांना रोज मारहाण करायचा. रविवारी दुपारी मुलगा गुलशन उर्फ गबरूला घरी पाणी न भरल्यामुळे आरोपी बापाने प्रचंड मारहाण केली. एवढ्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने गळा आवळून स्वतःच्याच मुलाची हत्या केली. घटनेच्या वेळी मृतक गबरूची बहीण घराबाहेर गेली होती. कुणालाही काहीही कळू नये यासाठी तो घराचे दार बंद करून बाहेर पडला. मात्र, काही वेळाने तो घरी परत आला. तेव्हा मुलागा हा झोपडीत मृतावस्थेत पडून असल्याचे लोकांना सांगत होता. या घटनेची माहिती समजताच कोराडी पोलिसांनी आरोपी
संतलालची विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना त्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताचे आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.