नागपूर :राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दिवाळीत सुद्धा रक्तरंजित घटना घडल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत शहरात दोघांची हत्या झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास कामठी परिसरात राहणार जफर अब्बास अली नावाचा एक तरुण यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी आला असता काही गुंडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात जफर अब्बास अली गंभीर जखमी झाला होता, काल रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दिवाळीच्या तीन दिवसांत नागपूर शहरात दोघांचा खून - Two murdered in Nagpur
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दिवाळीत सुद्धा रक्तरंजित घटना घडल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत शहरात दोघांची हत्या झाली आहे.
कामठी परिसरात राहणारा कुख्यात गुन्हेगार जफर अब्बास अली दिवाळीनिमित्त गोसावी आखाडा जवळ राहणाऱ्या मित्राच्या घरी शुभेच्छा द्यायला आला होता. जफर अब्बास अली मित्राच्या घरी बसून त्याच्या कुटुंबियांशी बोलत असताना परिसरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये मद्यपानाच्या विषयावरून वाद झाला. त्याच वादातून गोसावी आखाडा परिसरातील गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपींनी जफर अब्बास अली आणि त्याच्या मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. बेसावध असलेला जफर या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला लगेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत जफर च्या मित्राच्या कुटुंबातील दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहे. कामठी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
क्षुल्लक वादातून पाच गुंडांनी केली कुख्यात गुंडाची हत्या
नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकात एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे. फ्रॅंक भूषण अन्थोनी उर्फ फ्रॅंक अण्णा (४०) असे मृतकाचे नाव आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून पाच गुंडांनी संगनमत करून फ्रॅंक भूषण अनथोनी याची धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केली. फ्रॅंक अण्णाच्या हत्ये प्रकरणी जरीपटका पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये विकी उर्फ सतीश नंदलाल तायवाडे,क्रिस्तोफर संजय डॅनियल, सोबीएल संजय डॅनियल, सॅम पीटर, आणि आकाश रवी वाघाडे यांचा समावेश आहे.