महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Two Murder in Nagpur : नागपुरात वेगवेगळ्या भागात 24 तासांत दोन हत्या

Nagpur crime news : 24 तासाच्या अंतरात नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या भागात दोघांची हत्या झाल्याच्या घटना समोर ( Two Murder in Nagpur ) आल्या आहेत. हत्येची पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, तर दुसरी घटना ही पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

Two Murder in Nagpur
नागपुरात 24 तासांत दोन हत्या

By

Published : May 17, 2022, 6:00 PM IST

नागपूर -24 तासाच्या अंतरात नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या भागात दोघांची हत्या ( Two Murder in Nagpur ) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हत्येची पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, तर दुसरी घटना ही पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

पाहिल्या घटनेत -पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाच्या हातावरील टॅटूच्या मदतीने पोलिसांना मृतकाची ओळख पटवली. मृतक हा जरीपटकातील इटारसी पुलाजवळ राहणार अमन अविनाश नागदेवते (२२) असल्याचे स्पष्ठ हिताचे पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी मृतक अमनच्या संपर्कात असलेल्या त्याच्या मित्रांची विचारपूस सुरू केली. तेव्हा कैलास मसराम अजय उर्फ अज्जू यांच्यावर पोलिसांना संशय आला त्याच्या आधारे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली त्यांनी अमनची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

नागपुरात वेगवेगळ्या भागात 24 तासांत दोन हत्या

हेही वाचा -गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या; शाहूवाडी तालुक्यातील घटना

दुसरी घटना - ही पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूनापूरच्या स्मशानभूमीत असलेल्या शिव मंदिराच्या एका इसमाचा मृतदेह रक्ताने माखलेला अवस्थेत आढळून आला आहे. धर्मेंद्र सपाह असे मृतकाचे नाव असून तो कळमना मार्केटमध्ये रिक्षा चालवण्याचे काम करायचा. सोमवारी सकाळी धर्मेंद्रचा मृतदेह मंदिराच्या टेरेसवर आढळला होता. मृतकाच्या डोक्यावर जखमा असल्याने धर्मेंद्रची हत्या करण्यात आली असावी, असा दाट संशय पोलिसांना आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरचे मृत्यूचे कारण स्पष्ठ होणार आहे. त्यामुळे पोलीस पोस्टमार्टेम अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

नागपुरात वेगवेगळ्या भागात 24 तासांत दोन हत्या

हेही वाचा -महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन, सीजीएसटीचे मुख्य आयुक्त निलंबित

ABOUT THE AUTHOR

...view details