काही तासात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन बिबट्याचा मृत्यू - नागपूर जबलपूर महामार्ग
दोन वेगवेगळ्या घटनेत ( two separate incidents) दोन बिबट्याचा मृत्यू (Two leopards died) झाल्याची घटना दोन दिवसांमध्ये नागपूर वन परिक्षेत्रात घडल्या आहेत. बिबट्याच्या मृत्यूची पहिला घटना जिल्ह्यातील देवलापारमध्ये घडली आहे,तर दुसरी घटना ही देवलपारच्या मानेगाव क्षेत्रातील जबलपूर-नागपूर हायवे वर घडली आहे.
नागपूर:जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रात (Ramtek Forest Zone) काल रात्रीच्या दरम्यान देवलपार मानेगाव क्षेत्रातील नागपूर- जबलपूर महामार्गावरील ( Nagpur Jabalpur Highway ) एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची माहिती पुढे आली होती. वनविभागाचे पथक लगेच घटनास्थळी पोचले होते. मात्र,तोपर्यंत त्या बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर दुसरी घटना ही देवलापार वनपरिक्षेत्र उघडकीस आली आहे. पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबटाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता. काही तासांच्या अंतरात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शिके नुसार दोन्ही बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले.