महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाचे १२ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा ४४६ - नागपूर कोरोना बातमी

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचा वेग मंदावला असताना आज एकाच वेळी 12 रुग्ण पुढे आल्याने कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर कोरोना रुग्णालय
नागपूर कोरोना रुग्णालय

By

Published : May 27, 2020, 9:31 PM IST

नागपूर -शहरात आज नवीन 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका मृत महिलेचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातून आई वडिलांची तब्येत बघण्यासाठी कामठी येथे आलेल्या एका दाम्पत्याला आणि त्यांच्या मुलाला सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 446 इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचा वेग मंदावला असताना आज एकाच वेळी 12 रुग्ण पुढे आल्याने कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 9 वर पोहोचला आहे.

आज ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, ती महिला कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागात राहणारी आहे. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला होता. महिलेचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते, ते पॉझिटिव्ह आल्यामुळे हा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details