महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना 'पॉझिटिव्ह' - आयुक्त तुकाराम मुंढे

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी याबाबत अधिक माहिती अधिकृत ट्विटरवरून दिली आहे.

tukaram mundhe corona positive
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना 'पॉझिटिव्ह'

By

Published : Aug 25, 2020, 9:05 AM IST

Updated : Aug 25, 2020, 12:07 PM IST

नागपूर -कोरोनाची स्थिती ही दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरातही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. यातच आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सकाळी स्वतः ट्विट करत त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. तसेच संपर्कात आलेल्या नागरिक व अधिकाऱ्यांना चाचणी करण्याचे आवाहन देखील मुंढे यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत विविध प्रयत्न सुरू आहेत. ते स्वतः कोविड सेंटर्समध्ये जाऊन पाहणी करत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत स्वतः त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. तसेच कोव्हिड रुग्णांना स्वतः भेटून त्यांची विचारपूस करत होते.

काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याही संपर्कात मुंढे आले होते. असे असले तरी त्यांना तितके खास लक्षणे नसल्याने त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केल्याची माहिती दिली. तसेच काही दिवस वर्क फ्रॉम होम करणार असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महानगरपालिकेतील वाढती कोरोना स्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे यावरून लक्षात येते.

काही दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिकेत कामा व्यतिरिक्त येणे टाळा, असे आवाहन नागपूरकरांना केले होते.

Last Updated : Aug 25, 2020, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details