महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाला घाबरुन न जाता सतर्क राहा, तुकाराम मुंडेंचं जनतेला आवाहन - कोरोना विषाणूबद्दल बातमी

शहरात कोरोनाची लागण झालेले ४ रुग्ण आहेत.यापैकी २ अमेरिका १ दुबई आणि एक अमेरिकेवरून आलेल्या रुग्णाची पत्नी आहे. कोरोना रोगाला घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन तुकाराम मुंडे यांनी केले.

tukaram-munde-appealed-not-to-be-afraid-of-corona-illness-but-to-be-careful
कोरोना ला घाबरून न जाता सतर्क राहा तुकाराम मुंडेच जनतेला आवाहन

By

Published : Mar 17, 2020, 11:36 AM IST

नागपूर - शहरात कोरोनाची लागण झालेले ४ रुग्ण आहेत. यापैकी २ अमेरिका १ दुबई आणि एक अमेरिकेवरून आलेल्या रुग्णाची पत्नी अशी एकूण चार रुग्ण आहेत. चीन, जपान, कोरिया, इराण, इराक, इटली, स्पेन या ७ देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. मात्र, या देशांच्या यादीत वाढ झाली असून दुबई, सौदी अरेबिया आणि युएसए या देशातून येणाऱ्या प्रवाशांना देखील विमानतळावरून आधी विलगीकरन कक्षात ठेवण्यात येईल.

कोरोना ला घाबरून न जाता सतर्क राहा तुकाराम मुंडेच जनतेला आवाहन

महाराष्ट्रात येणारे रुग्ण हे या देशातील असल्या मुळे राज्य शासनाणी हा निर्णय घेतलाय, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली. कोरोनाला घाबरून न जात जनतेनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details