नागपूर-लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये अडकेलल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यानंतर नागपूरमधूनही या परप्रांतातील प्रवाश्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरात अडकलेल्या अशाच 84 प्रवाश्यांना नागपुरातून रस्ते मार्गे बसने रवाना करण्यात आले. नागपूर पोलिसांनी प्रवाशांना स्वगृही पाठवण्यासाठी प्रयत्न केले.
Lockdown: नागपुरातील शेल्टर होममध्ये अडकलेल्या 84 प्रवाशांची स्वगृही रवानगी - other state travelors
नागपूरमधून बसेसद्वारे 84 प्रवाशांना त्यांच्या राज्याकडे रवाना करण्यात आले. यात राजस्थान च्या 10, छत्तीसगडच्या राजनांदगाव च्या 41, मध्यप्रदेशच्या बालाघाट चे 27 व हरियाणाच्या 6 प्रवाशांचा समावेश आहे, यात 3 लहान मुलांचाही समावेश होता.
लॉकडाऊन ची घोषणा झाल्यापासून नागपूरात विविध शेल्टर होम तयार करण्यात आले होते. या विविध शेल्टर होम (निवारा) मधील 84 प्रवाशांना त्यांच्या राज्याकडे रवाना करण्यात आले. यात राजस्थान च्या 10, छत्तीसगडच्या राजनांदगाव च्या 41, मध्यप्रदेशच्या बालाघाट चे 27 व हरियाणाच्या 6 प्रवाशांचा समावेश आहे, यात 3 लहान मुलांचाही समावेश होता.
नागपूर पोलीस व सामाजिक संस्थांच्या मदतीने यांसर्व प्रवाशांना त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले. नागपूर येथून रविवार 3 मे ला लखनौसाठी मजुरांची पहिली ट्रेन रवाना झाली होती.