नागपूर -नागपुरात पाककला स्पर्धा संपन्न झाली. विविध ठिकाणच्या तृतीयपंथींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन केले होते नागपूरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ( Famous chef Vishnu Manohar ) यांनी. यात नाशिक औरंगाबाद, मुंबई आणि पुणे या शहरात ही स्पर्धा झाली असून या स्पर्धेचा अंतिम सामना हा नागपूरच्या जवाहर विद्यार्थी गृहात पार पडला आहे. यावेळी स्पर्धकांनी चविष्ट असे पदार्थ बनवले. ( Nagpur Transgender Cooking Competition )
स्पर्धा घेण्याचे नेमके सुचले कसे -नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे पुणे येथे एकदा गेले असताना सिग्नलवर त्यांच्या गाडीजवळ येऊन एका किन्नरने पैसे मागितले आणि त्यांनी दिलेही. पण त्यानंतर त्या किन्नरला ते विष्णू मनोहर असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्या किन्नरने 'तुम्ही विष्णू मनोहर आहेत ना?' आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून अनेक डिशेस बनवत असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले. सिग्नल, ट्रेन, रस्त्यावर, किन्नर हे पैसे मागत फिरताना आपण पाहिले असेल. त्यांचा या वागण्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळत नसून वेगळ्या नजरेने पाहून दूर्लक्ष केले जातात. पण यांना समाजात आपण स्थान देऊ शकतो का?. यासाठीच या स्पर्धेतून तो मार्ग मिळला. यात किन्नरमध्ये 16 वेगवेगळ्या प्रकारच्या कला त्यांच्या अंगी असतात. यातच डान्स करणे गाणं म्हणने, मेकअप आर्टिस्ट तसेच पाककला म्हणजे उत्तम असे स्वादिष्ट व्यजन सुद्धा बनवतात. याच लोकांमध्ये असलेले काही खास शेफ शोधण्याचा मानस घेऊन मोरूभाऊ सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली.
केवळ बोलून नाही तर सुरुवात नौकरी देऊन करणार - या स्पर्धेतून दोन चांगल्या शेफची निवड करून त्यांना विष्णुजी स्वतः नौकरीची संधी सन्मान देऊन उपलब्ध करून देणार आहे. तेच याच स्पर्धकामधील निकिता स्वतःचा ब्युटिशन आहे. या स्पर्धेच्या यशानंतर ती स्वतःचे अस्सल पुणेरी मिसळचे आउटलेट सुरू करणार आहे. ज्याचे उद्घाटन खुद्द विष्णू मनोहर हे करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. यामुळे या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने बदलही दिसून आले. त्याची सुरुवात किंवा नांदी म्हणावी अशीच आहे. याच मिसळ शॉपला नक्कीच लोक पसंती देतील असाही विश्वास प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी बोलून दाखवलय. सामजात राहताना काहीतरी वेगळं करण्याची जिद्द कायम ठेवाची संदेश देतात. श्रीदेवी लोंढे या मूळच्या मुंबईच्या असून मागील सात वर्षांपासून त्या शिकवण्याचे काम करत आहे. त्या किन्नरमधील मुंबईतील पहिल्या पदवीधारक आहे. त्या सामाजिक कार्यात सहभाग घेतात शिवाय या स्पर्धेत सहभागी होत त्यांची असलेली कला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांना चौथे पारितोषिक देण्यात आले. कितीही अडचणी आल्यातरी आपले प्रयत्न सुरू ठेवावे यासाठी जिद्द असून काही तरी वेगळं करायचे असेही त्या श्रीदेवी सांगतात.