मुंबई - मागील महिन्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचे सत्र सुरु होते. पण गेल्या 6 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज नवे दर जारी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आज वाढण्याची शक्यता होती. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. ( Todays Petrol Diesel Price in Maharashtra )
आजचा नागपुरात पेट्रोलचा दर 120.14 रुपये प्रति लिटर आहे. नागपूर पेट्रोलची किंमत आज सकाळी 6 वाजता लागू होते, नागपुरातील पेट्रोलची किंमत शेवटची 14 एप्रिल 2022 रोजी अपडेट केली गेली होती आणि सामान्यतः दररोज अपडेट केली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर तर डिझेल 104.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.
गेल्या कित्येक दिवसापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहराचे पेट्रोलचे दर खालील प्रमाणे -
मुंबई - पेट्रोल - 120.5, डिझेल -104.75
पुणे - पेट्रोल - 119.95, डिझेल - 102.66