नागपूर- शहरात मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला आहे.
रात्री आलेल्या मुसळधार पावसानंतर सकाळपासूनच ढगाळ वातवरण आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातवरण असल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी ओसरली होती. पुढील २४ तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.