नागपूर- आज दिवसभरात 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 559 इतकी झाली आहे.
नागपुरात दिवसभरात १९ कोरोना बाधित रुग्णांची भर - नागपूर कोरोना बातमी
सध्या नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयात 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या शिवाय 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.
काल (रविवार) देखील शहरात 19 नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या 8 दिवसांमध्ये नागपूरात तब्बल 125 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडलेली आहे. तर गेल्या 24 तासात 15 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, त्यामुळेच कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 395 झाली आहे.
सध्या नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयात 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या शिवाय 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. गेल्या 8 दिवसात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने कोरोना मुक्त होण्याची टक्केवारी कमी झाली आहे.