नागपूर - ज्याप्रमाणे चित्रपटांमधील चुकीचे दृश्य किव्हा आक्षेपार्ह बाबींना कात्री लावण्याची जबाबदारी ही सेन्सर बोर्डवर असते. त्याचप्रमाणे गाण्यातील आक्षेपार्ह आणि अश्लीलता वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डची (Sensor Board) नितांत आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मत सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, त्यात गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा होणार आहे. त्याकरिता ते नागपुरात दाखल झाले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केल आहे.
Sukhwinder Singh in Nagpur : गाण्यातील आक्षेपार्ह आणि अश्लीलता वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डची गरज - सुखविंदर सिंग - Sukhwinder Singh Concert in NAGPUR
गाण्यातील आक्षेपार्ह आणि अश्लीलता वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डची (Sensor Board) नितांत आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मत सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरातील खासदार क्रीडा महोत्सवात गायक सुखविंदर सिंग (Singer Sukhwinder Singh)ची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
![Sukhwinder Singh in Nagpur : गाण्यातील आक्षेपार्ह आणि अश्लीलता वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डची गरज - सुखविंदर सिंग Sukhwinder Singh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13931379-1088-13931379-1639723187413.jpg)
सध्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा (Abusive Language) सर्रास वापर केला जातो. अशा गीतकारासाठी थर्ड डिग्री वापरली पाहिजे अशा शब्दात गायक सुखविंदर सिंग (Singer Sukhwinder Singh) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या गाण्यांवर एका प्रकारे शस्त्रक्रिया करून रिमिक्स तयार करण्याची क्रेझ आली आहे,त्यात काही गैर नसले तरी क्रेडिटनेम मध्ये मात्र मूळ संगीतकारा ऐवजी नव्या संगीतकरांचेच नाव दिसून येत आहे. हा प्रकार म्हणजे संगीत क्षेत्रातील शुद्ध भ्रष्टाचार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
पाकिस्तानच्या व्यवहारामुळे कटुता
सीमारेषेवर पाकिस्तान कडून सातत्याने दहशतवादी कृत्य घडवले जातात. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले जातात. परिणामी भारताच्या कलावंतांना पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांना (Pakistani Actors Banned in India) भारतात बंदी घातली जाते. संगीताला सीमा जरी नसल्या तरी पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्यामुळे आमच्याही मनात कटुता निर्माण होते अशी प्रतिक्रिया सुखविंदर सिंग यांनी दिली आहे.
भारत ऑस्करचा गुलाम नाही
एखाद्या गाण्याला किंवा चित्रपटाला ऑस्कर अवार्ड मिळाला म्हणजे त्याची प्रतिष्ठा वाढते असा चुकीचा समज आपल्याकडे आहे. असे मत सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. ऑस्करपेक्षा आपल्या देशात मिळणारे मान सन्मान लाख मोलाचे असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा -Vaccine By Drone : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक प्रयोग यशस्वी