महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'त्या' वाघाचा मृत्यू विद्युत शॉकमुळे झाला, अहवालातून स्पष्ट - tiger death electric shock

उमरेड मकरधोकडा मार्गावर झुडपी भागात 13 मार्चला वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या वाघाचा मृत्यू प्राथमिक तपासात झुंजीत झाल्याची शंका होती. पण, वन विभागाच्या चौकशीत त्या वाघाचा मृत्यू तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याने झालाचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

tiger death electric shock nagpur
वाघ मृत्यू विद्युत शॉक नागपूर

By

Published : Mar 21, 2022, 12:11 PM IST

नागपूर - उमरेड मकरधोकडा मार्गावर झुडपी भागात 13 मार्चला वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या वाघाचा मृत्यू प्राथमिक तपासात झुंजीत झाल्याची शंका होती. पण, वन विभागाच्या चौकशीत त्या वाघाचा मृत्यू तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याने झालाचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी तो विद्युत प्रवाह सोडल्याने तिघांना अटक करण्यात आली. छिंदवाडा जिल्ह्यातील भय्यालाल दरसिमहा, मनकलाला दरसिमहा, दिलीप शीनू, असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -Nagpur Rape Case : संतापजनक! नागपुरात आठ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार

वाघाचा मृत्यू झाला त्या घटनास्थळापासून काही अंतरावर वीटभट्टी होती. वीटभट्टीवरील मजुरांनी जंगली डुकराची शिकार करून मास खाल्ले, अशी माहिती खबरीकडून मिळाली. चौकशी केली असता त्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या तिघांनी जंगली डुकराची शिकार करून मास खाण्यासाठी विद्युत प्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत त्यांनी पहिल्यांदाच विद्युत प्रवाह सोडून शिकार केली, असे नाही. यापूर्वीही त्यांनी पाच वेळा जंगली डुकराची शिकार विद्युत प्रवाह सोडून केली होती. यावेळी ते यशस्वी झाले, पण त्याच विद्युत प्रवाहामुळे वाघाचाही मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी दिली.

यामध्ये वन विभागाने चौकशी करून, तसेच मृत्यू अहवाल प्राप्त करून तिघांना अटक केली. तसेच, विद्युत प्रवाह सोडण्यासाठीचा तार आणि खुंट्यासुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार, आरएफओ ए.के. मडावी, तसेच वन विभागाचे लहू ठोकल, मंगेश कोटे, आकाश जेगंठे, के.पी. लांबधरे, गोपीचंद सहारे, नीलेश टवले, विनोद शेंडे आदी चौकशी करत आहे.

हेही वाचा -VIRAL VIDEO : नवनीत नाम सून के क्या लगा'; खासदार राणा यांचा पुष्पा स्टाईल व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details