नागपूर - नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन जणांचा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Lightning Strikes In Nagpur : नागपुरात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू - Thunderstorm
नागपूर ( Nagpur ) जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन जणांचा वादळी ( thunderstorm ) वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज अमरावती ( Amaravati ) आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
thunderstorm
जलालखेड्यात वीज कोसळली - जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यातील पेड मुक्तापूर आणि हिवरमठ येथे वीज कोसळून योगेश पाटे, ज्ञानेश्वर कांबडी, बाबाराव इंगळे यांचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यात मौजा कोहळा लाखोळी येथेही सुखराम बिसादरे यांची गाय वीज पडून मरण पावली. तर नरखेड तालुक्यात एका बैलजोडीचा मृत्यू झाला.
हेही वाचा -शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे - नितीन गडकरी