महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 2, 2021, 9:58 AM IST

Updated : Oct 2, 2021, 11:24 AM IST

ETV Bharat / city

धक्कादायक! नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या कौमार्याच्या विक्रीचा प्रयत्न; तीन महिलांना अटक

स्वत:च्याच मैत्रीणीच्या ११ वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन जातो, अशी बतावणी करून त्या चिमुकलीच्या कौमार्याचा ४० हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Nagpur
Nagpur

नागपूर- मैत्रिणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तिच्या ११ वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन जातो, अशी बतावणी करून त्या चिमुकलीच्या कौमार्याचा ४० हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांना माहिती समजताच सापळा रचून त्या चिमुकलीची सुखरूप सुटका करत तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सूत्रधार अर्चना शेखर वैंशपायन, रंजना मेश्राम आणि कविता निखारे, असे अटक करण्यात आलेल्या तीनही महिलांची नावे आहेत.

प्रतिक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी अर्चना वैंशपायन या महिलेने मैत्रिणीच्या मुलीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी घेऊन गेली. घराबाहेर पडल्यानंतर आरोपींनी देहव्यावसाय खूप पैसे मिळतात, अश्या प्रकारचे प्रलोभन त्या मुलीला दिले. आरोपी महिलांनी त्या चिमुकलीला एका फ्लॅटवरून ग्राहक शोधण्याचे काम सुरू केले. काही ग्राहकांना व्हाट्सअपवर मेसेज देण्यात आला होता. यासंदर्भात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती समजतात त्यांनी खोटा ग्राहक पाठवून माहितीची सत्यता पटवली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी छापा टाकून त्या चिमुकलीची सुटका करत तीनही आरोपी महिलांना अटक केली आहे.

आरोपी महिला देहव्यावसायात सक्रिय -

देहविक्री व्यावसायात अर्चना वैंशपायनसह अटक करण्यात आलेल्या बाकी महिलाही सक्रिय आहेत. गरीब मुलींना पैशांचे प्रलोभन देऊन त्यांना देहविक्री व्यावसायात ओढण्याचे पाप या महिलांकडून अनेक वेळा करण्यात आले आहे. यापैकी एक महिलेला देह व्यवसायच्या आरोपाखाली अटक झाली झाली होती. नुकतीच ती कारागृहातून बाहेर आली होती.

हेही वाचा - महाराष्ट्रात कधीही निवडणूका लागू शकतात; आशिष शेलार यांचं खळबळजनक विधान

Last Updated : Oct 2, 2021, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details