नागपूर- राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याचा अंमलबजावणीला सुरुवात झाली. उपराजधानी नागपुरात पहिल्याच दणक्यात तब्बल 11 हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहन परवाना निलंबनाची कारवाई ( Three Months Suspend Driving Licence ) झाली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई हेल्मेट न घालणे ( Bike Riding Without Helmet ) तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पहिल्यांदाच मिळून आले तरी ही कारवाई झाली आहे. यामुळे घराबाहेर हेल्मेटशिवाय बाहेर पडल्यास दंडासोबत तीन महिने वाहन चालवता येणारे नाही, अशी तरतूद आहे.
परवाना निलंबित केल्यानंतरही वाहन चालवल्यास दंड अन् फौजदारी कारवाई होईल
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ केली होती. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या 100 ते 500 रुपये दंडाची रक्कम वाढवून तब्बल 10 हजारापर्यंत करण्याचा निर्णय 2019 मध्येच घेण्यात आला होता. पण, त्यावेळी महाराष्ट्रात कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी अंमलबजावणीला महाराष्ट्रात सुरुवात झाली. यात उपराजधानी नागपुरातही कायद्याची अंमलबजावणी होताच 11 हजार 463 पेक्षा जास्त वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच विना हेल्मेट किंवा ट्रिपलसीट मिळून आल्यास 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आणि 3 महिने वाहन चालवण्यास बंदी असणार आहे. वाहतूक परवाना निलंबनानंतर जर कोणी वाहन चालवताना मिळून आल्यास दंडाच्या रक्कमेत वाढणार शिवाय फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तरतूद आहे. यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे.
अवघ्या 12 दिवसांत विविध कारवाईत लाखोंचा दंड वसूल...